हतनूरमधून पाण्याचे आवर्तन सोडावे : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी


भुसावळ (5 जानेवारी 2025) : हतनूर धरणातून आवर्तन सोडले नसल्याने वरणगाव शहरातील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. आधीच 15 दिवसांआड पाणी मिळत असल्याने हिवाळ्यात पाणीटंचाई भासत आहे. हतनूर धरणाचे आवर्तन सुटले नसल्याने वरणगाव शहरासह परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कठोरा जॅकवेलवर माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, कामगार नेते मिलिंद मेढे, बळीराम दादा सोनवणे, नामदेव सोनवणे, इरफान पिंजारी, नाना चौधरी, नंदू जोशी, अजमल खान, फजल खान, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, हितेश चौधरी, डॉ.नाना चांदणे, योगेश माळी, रमेश पालवे, अनिल वंजारी, संतोष पाटील, मयूर शेळके, डॉ.सादीक शेख, मुस्लीम अन्सारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी जागेवर धडक मारली.

जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी सुनील काळे यांनी केली. डॉ.आयुष प्रसाद यांनी धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, इंटेक वेल नदीपात्रात नव्याने उभारण्यात यावी जेणेकरून आवर्तनाची वाट पहावी लागणार नाही. यावेळी नगरपरिषदेचे जनार्दन पवार, मुक्तार भाई, योगेश धनगर, किरण जाधव, वीज कंपनी अधिकारी कुलकर्णी व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !