सावदा पोलिसांची मोठी कारवाई : महिलेच्या घरातून तब्बल 646 ग्रॅम गांजा जप्त


सावदा, ता.रावेर (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका महिलेच्या घरातून तब्बल 646 ग्रॅम गांजा जप्त केल्याने अवैधरित्या गांजा विक्री करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुमताजबी उर्फ नमा शेख सलीम (49, ख्वाजा नगर, सावदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सावद्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश फड यांना सावदा शहरातील खाजानगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार पथकाने शनिवार, 1 रोजी रात्री सुरूवातीला सिकंदर तडवी यांच्या घराची झडती घेतली मात्र आक्षेपार्ह काहीही आढळले नाही तर काही अंतरावरील नमा शेख सलीम यांच्या घराची झडती घेतल्यानंतर लोखंडी कपाटात तब्बल 646 ग्रॅम वजनाचा गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. हवालदार निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईनंतर पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल सावदा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा सहस.निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, हवालदार उमेश पाटील, हवालदार निलेश बाविस्कर, कॉन्स्टेबल संजय तडवी, कॉन्स्टेबल बबन तडवी, कॉन्स्टेबल प्रकाश जोशी, कॉन्स्टेबल नामदेव कापडे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !