अट्रावलला चार लाखांचे केळी घड अज्ञात माथेफिरूने कापून फेकले

महिनाभरात तिसरी घटना, शेतकरी हवालदिल


यावल (6 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल गावातील शेतकर्‍याच्या जुन्या अट्रावल रस्त्यावरील यावल शेत-शिवारातील शेत गट क्रमांक 601 मध्ये अज्ञात माथेफिरूने कापणी योग्य केळीचे घड कापून फेकले. तब्बल तीन हजार केळीच्या घडांची नासधूस करीत शेतकर्‍यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान करण्यात आले. ही घटना रविवारी निदर्शनास आली. याप्रकरणी यावल पोलिात अज्ञात माथेफिरुविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सातत्याने अट्रावल गावात दिड महिन्याच्या अंतरात ही तिसरी तर चार वर्षात ही सहावी घटना घडल्याने शेतकर्‍यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

सततच्या प्रकारांमुळे शेतकरी संतप्त
अट्रावल गावात केशव गोवर्धन चौधरी हे शेतकरी राहतात. त्यांच्या जुन्या अट्रावल रस्त्यावर यावल शिवारात शेत गट क्रमांक 601 मध्ये त्यांनी केळीची लागवड केली. या शेतात पाच हजार 800 खोड केळी लावण्यात आली. ती कापणी योग्य झाली होती मात्र त्यांच्या शेतात अज्ञात माथेफिरूने शनिवारी मध्यरात्रीनंतर जाऊन शेतातील कापणी योग्य झालेल्या तीन हजार केळीचे घड कापून फेकून दिले.


विशेष म्हणजे केळं अर्धे कापले व नासधूस केले आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍याचे तब्बल चार लाखांचे नुकसान झाले. हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. घटनेची माहिती आमदार अमोल जावळे यांनी मिळाल्यावर त्यांनी स्वतः शेतात जावून पाहणी करीता शेतकर्‍याला धीर दिला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शेतकरी केशव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !