जळगावात भरधाव रिक्षाचा कट लागल्याने दुचाकीस्वार जखमी


जळगाव (13 जानेवारी 2025) : भरधाव रिक्षाचा कट लागल्याने मोपेडवरील दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळुन जखमी झाला. रविवार,12 रोजी दुपारी ही घटना स्वातंत्र्य चौकात घडली.

प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जखमीची दुचाकी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लावण्यात आली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बसस्थानकातून एस.टी.बस आकाशवाणीकडे जात असताना वेगात रिक्षा काढण्याच्या प्रयत्नात मोपेडला कट लागताच मोपेडस्वार जखमी झाला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !