भुसावळातील तुकाराम नगरात घरफोडी : 60 हजारांचा ऐवज लांबवला
भुसावळ (14 जानेवारी 2025) : शहरातील स्वामी स्वामी नारायण मंदिराजवळील तुकाराम नगरात बंद घर फोडत चोरट्यांनी 50 हजारांची रोकड व दहा हजारांचे चांदीचे शिक्के लांबवले. घरफोडीची घटना रविवार, 12 जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
तुकाराम नगरात मालती चंद्रशेखर महाजन (67) या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. 11 ते 12 जानेवारी दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे शिक्के व 50 हजारांची रोकड मिळून 60 हजारांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीचा प्रकार रविवार, 12 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता वाजता उघडकीस आला. याप्रकरणी वृध्द महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेश चौधरी करीत आहेत.







