भुसावळातील तरुणाची गोळीबार करीत हत्या : आरोपींकडून स्वेटरसह बाईक जप्त


Youth shot dead in Bhusawal : Bike along with sweater seized from accused भुसावळ (15 जानेवारी 2025) : शहरातील जाम मोहल्ला चौकात डीडी टी हाऊसवर चहा पिण्यास आलेल्या तेहरीन नसीर शेख (27) या तरुणाचा 10 जानेवारीला तीन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. खून प्रकरणातील संशयीत अदनान उर्फ युनूस याची चौकशी केल्यानंतर त्याने नहाटा चौफुलीच्या पुढे लपवून ठेवलेले स्वेटर आणि जळगव अजिंठा चौफुलीजवळ लपवून ठेवलेली मोटरसायकल पोलिसांना मंगळवारी काढून दिली.

मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खून
शहरातील खडकारोडवरील जाम मोहल्ला चौकातील डीडी टी हाऊसवर चहा पिण्यासाठी आलेल्या तेहरीन नासीर शेख (27) आल्यानंतर त्याच्यावर शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला होता. खून प्रकरणी पाच संशयीतांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयीत अदनान उर्फ युनूसची पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर त्याने नहाटा चौफुलीच्या पुढे एका बोगद्याजवळ त्याच्या अंगातील स्वेटर लपविले होते व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जळगावला अजिंठा चौफुलीजवळ लपवल्याने ती पोलिसांना काढून दिली.


यावेळी बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, हवालदार रमण सुरळकर यांच्यासह पंच उपस्थित होते. या प्रकरणात हल्लेखोरांनी दोन मोटरसायकली वापरल्या होत्या. अन्य दुसर्‍या मोटर सायकलीचा पोलीस शोध घेत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !