सावदा पोलिसांची मोठी कारवाई : एक लाख 61 हजारांच्या गुटख्यासह तिघे जाळ्यात


सावदा (15 जानेवारी 2025) : सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा चिनावल-उटखेडा रस्त्यावरील सुकी नदीचे पुलावर जप्त केला. तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून एक लाख 61 हजार 105 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सावदा सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांना गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. 13 रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान चिनावल व उटखेडा शिवारात दुचाकी (एम.एच.19 बी.ए. 7578)वरून येत असलेल्या अजय शांताराम कोळी (37, रा.रोझोदा) व यश उर्फ योगेश पितांबर चौधरी (27, रा.चिनावल), अस्लम सलीम तडवी (29, रा.लोहारा) यांना अटक करण्यात आली तर दुचाकीसह एक लाख 61 हजार 105 किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !