भुसावळातील तरुणाचा खून प्रकरण : मालेगावात लपवलेली दुचाकी जप्त


भुसावळ (16 जानेवारी 2025) : शहरातील जाम मोहल्ला चौकात डीडी टी हाऊसवर चहा पिण्यास आलेल्या तेहरीन नासीर शेख (27) या तरुणाचा शुक्रवार, 10 जानेवारीला खून करण्यात आला होता. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात एका आरोपीचे स्वेटर व दुचाकी जळगावातून जप्त करण्यात आल्यानंतर दुसरी दुचाकी बुधवारी मालेगाव शहरातून जप्त करण्यात आली.

मित्राच्या हत्येचा घेतला बदला
शहरातील खडका रोडवरील जाम मोहल्ला चौकातील डीडी टी हाऊसवर चहा पिण्यासाठी आलेल्या तेहरीन नासीर शेख (27) या तरुणावर शुक्रवार, 10 जानेवारीला सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून खून करण्यात आला होता. सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीतांपैकी पाच संशयीतांना अटक करण्यात आली. अटकेतील संशयीत अदनान उर्फ युनुस याला पोलीस खाक्या दाखविल्यावर त्याने बुधवारी नाहाटा चौफुलीच्या पुढे एका बोगद्याजवळ लपवलेले अंगातील स्वेटर व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जळगावच्या अजिंठा चौफुलीजवळून काढून दिली.


बुधवारी पोलिसांनी संशयीताला सोबत घेत मालेगाव गाठले. तेथून सुध्दा पोलिसांनी दुसरी दुचाकी जप्त केली. खुनाच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही मोटर सायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व तपास पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !