बामणोदजवळ मोर नदीतून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


यावल (17 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील बामणोदजवळील मोर नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुक करतांना ट्रॅक्टर महसुलच्या पथकाने पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. संबंधीत ट्रॅक्टर मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या आदेशान्वये बामणोद मंडळाधिकारी बबिता चौधरी, तलाठी विजय शिरसाठ, कोसगाव तलाठी दिलीप केदारे यांच्या महसूल पथकाने बामणोदजवळील मोर नदी पात्रात आमोदा येथील किरण लीलाधर सपकाळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम. एच.19 बी.जी. 6143) व्दारे अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पकडले. ट्रॅक्टर चालक कल्पेश सपकाळे यांच्याकडे वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचनामा करून यावल तहसील कार्यालयामध्ये ट्रॅक्टर लावण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !