यावल शहरातील महाराणा प्रताप नगरामधून मोटरसायकल चोरी
यावल (17 जानेवारी 2025) : शहरात चोपडा रस्त्यावरील महाराणा प्रताप नगरात घराबाहेर लावलेली मोटरसायकल लांबवण्यात आली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराणा प्रताप नगरात जुनेद शाह रफिक शाह वास्तव्यास अनू त्यांच्या घराबाहेर मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 19 ई.ई. 8847) ही लावली असता अज्ञात चोरट्याने चोरी केली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.







