दहिगावात 40 वर्षीय इसमाला एकाची मारहाण
40-year-old Isma beaten up by someone in Dahigaon यावल (18 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 40 वर्षीय शेतकर्याने एकाला सांगितले की, तू शेतातील फवारणीच्या औषधीची बाटली का आणली ? याचा राग येऊन एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण
दहिगावातील विनोद सुरेश पाटील (40) हा इसम कुंभारवाड्याजवळ असताना विजय पंढरीनाथ पाटील याला सांगितले की, तू शेतातली फवारणीची औषधीची बाटली का आणली, या विचारल्याच्या रागातून विजय पाटील यांनी विनोद पाटील याला थेट शिवीगाळ करून मारहाण केली. लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली व त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.







