मुक्ताईनगरात भीषण अपघातात पिंप्रीपंचमचे माजी सरपंच ठार


Former Sarpanch of Pimpri Pancham killed in a horrific accident in Muktai Nagar मुक्ताईनगर (22 जानेवारी 2025) : भरधाव कंटेनरने माजी सरपंचाला चिरडल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर महामार्गावरील नायगाव फाट्याजवळील उड्डाणपूल परिसरात घडली. रघुनाथ नाना पाटील (70, रा. पिंप्रीपंचम ता. मुक्ताईनगर) असे मयत माजी सरपंचाचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
पिंपरीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील माजी सरपंच रघुनाथ पाटील हे टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.683) ने मुक्ताईनगरकडे जात असताना नायगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरकडे जाणार्‍या ट्रक कंटेनर (एच.आर.38 ए.डी.5109) ने त्यांना मागून धडक दिली.





कंटेनरचे चाक रघुनाथ पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान तुकाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत
कंटेनर चालक विजय महेश्वर बैठक (रा.लखनी तपुरमेसपट्टी, ता.उजियारपूर जि.समस्तीपुर, बिहार) विरोधात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास हवालदार लिलाधर भोई करीत आहेत.

साईडपट्ट्या नसल्यामुळे वाढले अपघात
नायगाव फाट्याजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूने महामार्गावर गतिरोधक बसवले आहेत. तरीही वाहने भरधाव चालवली जातात. दुसरीकडे या भागातील रस्त्याला साईडपट्ट्या नाहीत त्यामुळे खोलगट भागातून महामार्गावर वाहन चढवावे लागते. मंगळवारच्या अपघाताला हेच कारण ठरले. खचलेल्या साईड पट्टीवरून दुचाकी महामार्गावर आणताना ती घसरली. यामुळे खाली पडलेल्या पाटील यांच्या डोक्यावरून मागून येणार्‍या कंटेनरचे चाक गेले. अपघात झाल्यावर साईटपट्टी भरण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !