चुंचाळेजवळ 32 वर्षीय महिलेला विहिरीत ढकलले : तरुणाविरोधात गुन्हा
32-year-old woman pushed into well near Chunchale: Crime against youth यावल (27 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील चुंचाळे या गावाजवळ शेत विहिरीत 32 वर्षीय महिलस एका तरुणाने विहिरीत ढकलत पळ काढनाा. ही घटना सोमवारी उघडकीस आली. महिलेला विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले नेमके
चुंचाळे शेतशिवारात प्रकाश जैन यांचे शेत आहे. या शेतातील विहिरीत उमा रविकांत चमखाने (32, रा.मोठा बालाजी मंदिर, माजनपेठ, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) ही महिला सलमान पठाण (पातोंडा, ता.लालबाग) याच्यासोबत रविवारी मनुदेवी दर्शना करीता आली होती व दुपारी एक वाजेला ते शेतात नाश्ता करत होते. नाश्ता झाल्यानंतर या तरुणाने महिलेला विहिरीत किती खोल पाणी आहे बघं असे सांगितले व महिला विहिरीत डोेकावत असतांना तिला तरुणाने विहिरीत ढकलून दिले आणि तेथून तो पसार झाला. सोमवारी सकाळी या महिलेचा आवाज विहिरीतून ऐकल्यानंतर यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहसीन खान हे पथकासह दाखल झाले. महिलेला विहिरीतून काढण्यात आले.


महिलेचा हात आणि पाय फ्रॅक्चर आहे. महिलेला जळगावी हलवण्यात आले. यावल पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून सलमान पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार पाराजी वाघमोडे करीत आहे.





