चुंचाळे शेत-शिवारात प्रेयसीला विहिरीत ढकलले : रेड्यांची शर्यत पाहताना प्रियकराला यावल पोलिसांकडून बेड्या


A man pushed his girlfriend into a well in a field: The boyfriend was handcuffed by the police while watching a horse race. यावल (29 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील चुंचाळे शेत शिवारात मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर येथील एका 32 वर्षीय महिलेला तिच्या प्रियकराने विहिरीत ढकलून पळ काढला होता. या घटनेत सुदैवाने महिला बचावली व घडलेल्या प्रकाराबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 24 तासात आरोपीला मध्य प्रदेशातून शिताफीने अटक करण्यात आली. महिलेला विहिरीत ढकलून संशयीत निर्भयपणे सांगोळा, ता.बर्‍हाणपूर येथे रेड्यांची शर्यत पाहत असताना त्याच्यावर कारवाई झाली आहे.

अहे आहे प्रकरण
उमा रविकांत चमखाने (32, रा.मोठा बालाजी मंदिर, माजनपेठ, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या महिलेस तिचा प्रियकर सलमान तडवी (पातोंडा, ता.लालबाग) हा रविवारी मनुदेवी दर्शनाकरीता घेवून आला होता व मनुदेवी येथुन परत जातांना ते दोघे चुंचाळे, ता.यावल या गावाच्या शेतशिवारात प्रकाश जैन यांच्या शेतात थांबले होते. आरोपीने महिला विहिरीत डोेकावत असतांना तिला विहिरीत ढकलून देत पळ काढल. सोमवारी सकाळी या महिलेस विहिरीतून बाहेर काढल्यानंतर यावल पोलिसात तरुणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारीच सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे, सचिन पाटील यांच्या तसेच लाल बाग पोलिसांच्या मदतीने पोलीस नाईक मोहसीन सत्तार खान, हवालदार अनिल साळुंके, योगेश खोंडे यांनी सापळा संशयीत आरोपी सलमान तडवी याला सांगोळा येथून ताब्यात घेतले. त्याला यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता 1 फेब्रुवारीपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !