बोदवड बसस्थानकातून महिलेची पोत लांबवली


Woman’s body dragged from Bodwad bus stand बोदवड (1 फेब्रुवारी 2025) : बोदवड बसस्थानकातून अज्ञाताने 21 वर्षीय महिलेची 22 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. ही घटना शनिवार, 25 रोजी दुपारी पावणेदोन वाजता घडली. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्विता रामेश्वर सोनवणे (21, कुर्‍हाहरदो, ता.बोदवड) या महिलेच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने पर्सला ब्लेड मारून त्यातील साडेपाच ग्रॅम वजनाची व 22 हजार रुपये किंमतीची पोत लांबवली. तपास नाईक शशिकांत महाले करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !