किनगाव बुद्रुक गावात दारूची बाटली आणून दिली नाही म्हणून तरुणाला मारहाण
A young man was beaten up for not bringing a bottle of liquor in Kingaon Budruk village यावल (2 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर एका 25 वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने दारूची बाटली आणून दे म्हटले मात्र नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून तरुणाला एकाने शिवीगाळ करून मारहाण करून जबर दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
किनगाव बुद्रुक गावातील चुंचाळे रोडवरून पंकज सुरेश पाटील (25) हा तरुण जात असताना तेथे गणेश मोहन चौधरी हा आला आणि त्याने या तरुणाला सांगितले की, तू मला दारूची बाटली आणून दे मात्र नकार देताच राग घेऊन गणेश चौधरी याने पंकजला शिविगाळ करून मारहाण केली आणि त्याच्या दोन्ही पायाला लाकडाच्या बल्लीने मारून दुखापत केली. डोक्यावर वार करून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.








