जळगावसह खामगाव, एरंडोलमध्ये 13 घरफोड्यांचे रेकॉर्ड : कुविख्यात घरफोड्या जाळ्यात

पाचोरा पोलिसांची कामगिरी : दोन पसार संशयीतांचा कसून शोध


जळगाव (13 फेब्रुवारी 2025) : पाचोरा शहरात ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीनंतर पाचोरा पोलिसांनी कुविख्यात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने आतापर्यंत तब्बल 13 घरफोड्या केल्याची माहिती समोर आली असून आरोपींचे साथीदार पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

पाचोर्‍यात झाली होती चोरी
पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून 2 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड करुन तेथील डीव्हीआर व दुकानातील 68 हजार रुपयांचे सोन्या च चांदीचे दागीने लांबवण्यात आले हेाते. राहुल विश्वनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासातून पोलिसांनी रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (रा.राजीव गांधी नगर, जळगाव) यास रामानंद नगर पोलिसांनी 8 फेब्रुवारी रोजी राजीव गांधी नगरातून अटक केली.




धरणगावातही केली चोरी
तपासात आरोपीने धरणगाव पोलीस ठाणे हद्दीतून बोलेरो कार (क्रमांक एम.एच.19 ए.एक्स.7098) लांबवल्याने ती जप्त करण्यात आली तर 4 रोजी खामगाव, जि.बुलढाणा येथे एटीएम फोडत ते बोलेरोतून नेण्याचा प्रयत्न केल्याचेही कबुल केले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगाव येथे गुन्हा दाखल आहे. धरणगाव पोलिसांकडून आरोपीचा पाचोरा पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर त्याने पाचारेा येथे गुन्हा केल्याची कबुली दिली व या गुन्ह्यात त्याचा साथीदार सख्खा भाऊ हघुलसिंग उर्फ शक्तीसिंग जीवनसिंग जुन्नी (रा.राजीव गांधी नगर, जळगाव), सुवेरसिंग राजुसिंग टाक (रा.मानवत, परभणी) शेरुसिंग स्वजितसिंग बोंड (रा.बोंड, परभणी) सहभागी असल्याचे सांगत गुन्ह्यातील ऐवज जळगावातील सोनाराकडे गहाण ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी 67 हजार 81 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

13 गुन्ह्यांची उकल
आरोपीविरोधात जळगाव, बुलडाणा येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे. यात मलकापूर पोलिसात दोन, रामानंद नगर पोलीस स्टेशनला सात, जिल्हापेठ पोलीस स्टेशन व शनिपेठला प्रत्येकी एक तर एरंडोल व शिवाजी नगर पोलीस स्टेशन, खामगाव प्रत्येकी एक मिळून एकूण 13 गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार राहुल शिंपी, सहा.पोलीस उपनिरीक्षक रणजीत पाटील, योगेश पाटील, सागर पाटील, मजीखान पठाण यांच्या पथकाने केली.1








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !