उमर्टी ऐरणीवर : पुणे जिल्ह्यातील आरोपींना गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह चोपडा ग्रामीण पोलिसांनी पकडले


On the verge of death: The accused in Pune district were arrested by Chopra Rural Police with village knives, live cartridges चोपडा (14 फेब्रुवारी 2025) : उमर्टीहून गावठी शस्त्र आणत असताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींविरोधात पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती असून दोन जिवंत काडतूस व कट्टा जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पारउमर्टी (मध्यप्रदेश) कडून लासुर ते हातेड रोडने चार जण गावठी बनावटीचे कट्टे घेत असल्याची माहिती मिळताच शशिकांत हिरालाल पारधी, रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल पाटील, विठ्ठल कैलास पाटील, चेतन महाजन यांनी लासुर ते बुधगाव रोडवरील फाट्यावर सापळा रचला. संशयीत वैभव शैलेश गायकवाड (केशवनगर, ता.हवेली, जि.पुणे), सुजल प्रकाश गायकवाड (सर्वोदय कॉलनी, ता.हवेली, जि.पुणे), सौरभ सुनील जाधव (साईनाथ नगर, सारथी स्कूलजवळ, वडगाव शेरी, ता.हवेली, जि.पुणे), स्वय पिटु राय (रा.सर्वोदय कॉलनी पोस्ट ऑफिसच्यामागे, ता.हवेली, जि.पुणे) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विठ्ठल कैलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. वरील आरोपींवर पुणे, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.




यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगा विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, नाईक शशिकांत यांनी केली आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !