एरंडेाल तालुक्यातील तरुण गावठी कट्ट्यासह गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव (14 फेब्रुवारी 2025) : एरंडोल तालुक्यातील रवंजे बु.॥ गावातील तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा वबाळगताना पकडले. प्रवीण अशोक कोळी (22) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार संदीप पाटील, भगवान पाटील, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी आदींनी रवंजे बु ॥ गावाबाहेरील गौरीशंकर माध्यमिक विद्यालयासमोर 11 रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान आरोपी प्रवीण अशोक कोळी (22) यास ताब्यात घेतले. आरोपीकडील गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल राहुल कोळी यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.




तपास एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास गबाले, शंकर पवार, अनिल पाटील करीत आहेत.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !