शेतकरीपुत्र प्रमोद रमेश पाटे यांनी रोवला यशाचा झेंडा ! मंत्रालयीन महसुल सहाय्यकपदी निवड


पाचोरा (14 फेब्रुवारी 2025)  : गुणवत्ता असेल तर परिस्थिती नतमस्तक होते. यशाचे मंगलस्वर निनादतात. पाचोरा तालुक्यातील तारखेडे येथील रहिवासी प्रमोद रमेश पाटे यांनी यशाची अशीच मोहोर कोरली आहे. शेतकरीपुत्र असणार्‍या प्रमोद यांची मंत्रालयीन महसुल सहाय्यकपदी निवड झाली आहे.

2023-2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत त्यांनी पहिल्याचं प्रयत्नात हे यश मिळविले आहे. काही तांत्रिक कारणामुळे या परीक्षेचा निकाल उशीरा जाहीर करण्यात आला. शेतीमातीत राबणा-या आई-वडिलांच्या कष्टाचे त्यांनी चीज केले असून खडतर परिस्थितीत संघर्ष करणा-या विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चाळीसगाव येथील आडत व्यापारी हेमंतकुमार आनंदा वाणी यांचे ते शालक आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !