भुसावळातील पंपावर पेट्रोल वितरण ठप्प पडते तेव्हा…. वाचा नेमके काय घडले…!
Petrol distribution halted at Bhusawal pump भुसावळ (14 फेब्रुवारी 2025) : शहरातील हिंदूस्थान पेट्रोलियमच्या सहा पंपावर तांत्रिक दोष निर्माण झाल्याने त्याचा फटका शहरातील वाहनधारकांना तब्बल सव्वा तास बसला. कंपनीतून दोष निवारण केल्यावर पेट्रोल पंपावर पेट्रोल वितरण पूर्ववत सुरू झाले.
वाहनधारक झाले हैराण
नाशिक येथे एचपी कंपनीत तांत्रिक दोष निर्माण होताच शहरातील संबंधित कंपनीच्या सहाही पेट्रोल पंपातून पेट्रोल वितरण थांबले. सुरूवातील काय घडले हे स्पष्ट होत नव्हते मात्र तांत्रिक दोष नाशिक येथून झाल्याचे कळाल्यानंतर पंप चालकांनी वाहनधारकांना काही वेळेत ही समस्या सुटेल, असे सांगून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता बंद झालेले पेट्रोल वितरण हे 11.20 वाजता पुन्हा पूर्वत्व झाले. पेट्रोल गाड्यामध्ये भरत असतांना अचानक कुठलीही पूर्व कल्पना न देता बंद झाल्याने वाहधारकांमध्ये खळबळ उडाली होती.







