चोरटे सुसाट : अमळनेर तालुक्यातून तीन दुचाकींची चोरी
Chorte Susat : Theft of three two-wheelers from Amalner taluka अमळनेर (शनिवार, 8 ऑगस्ट 2026) : अमळनेर तालुक्यातील चौबारी व गलवाडे येथून अज्ञात चोरट्यानी तीन मोटारसायकली चोरून नेल्याच्या घटना 2 रोजी रात्री ते 3 रोजी सकाळ दरम्यान घडली.
चौबारी व गलवाडे या दोन्ही गावातून लोकांच्या अंगणात लावलेल्या 25 हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली 22 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.ई.1896), तसेच मोटरसायकल (क्रमांक एम.एच.12 एच.जी.3234) व मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 ई.सी.705) अज्ञात चोरट्यांनी लांबवली.


चौबारी येथील रामदास निंबा पाटील या शेतकर्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत.
