आमदार एकनाथराव खडसेंच्या भाजपा प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिली ही प्रतिक्रिया
जळगाव (16 फेब्रुवारी 2025) : आमदार एकनाथ खडसे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या मात्र त्यानंतर खुद्द आमदार खडसे यांनी विकासकामांसंदर्भात भेट घेतल्याचे सांगितले होते. यानंतर जळगाव जिल्हा दौर्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता ते म्हणाले की, पक्ष प्रवेशाबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, असेही बावनकुळे यांनी सांगून भाजपा प्रवेशाबाबत अधिक बोलणे टाळले.
चर्चा करूनच निर्णय घेणार
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे कार्यकर्ते, नेत्यांच्या घरवापसीची मागणी जोर धरत आहे. मात्र, हा निर्णय शिस्तभंग समितीच्या माध्यमातून घेतला जाईल. त्यात तिन्ही पक्षांशी चर्चा करून कुणाला अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. भाजपच्या संघटन पर्व उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेसाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी जळगावात आले होते.

