पुणे-जम्मू तवी एक्सप्रेस तात्पुरता रद्द


भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : उत्तर रेल्वेतील जम्मूतवी स्टेशनवर पुनर्विकास आणि यार्ड कनेक्शन संदर्भातील नॉन-इंटरलॉकिंग कामे सुरू असल्याने भुसावळ विभागातून जाणारी गाडी क्रमांक 11077 पुणे ते जम्मूतवी एक्सप्रेस 17 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी ते पुणे एक्सप्रेस 19 फेब्रुवारी ते 06 मार्चदरम्यान रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी व रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !