महाकुंभ मेळा : रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय ; चार गाड्यांच्या मार्गात परिवर्तन
भुसावळ (16 फेब्रुवारी 2025) : रेल्वे प्रशासनाने महाकुंभ मेळा 2025 दरम्यान भुसावळ विभागातून जाणार्या चार गाड्यांच्या मार्गात परिवर्तन केले असून या बदलामुळे रेल्वे प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
गाडी क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्सप्रेस
सोमवार, 17 रोजी प्रवास सुरू होणारी निर्धारित मार्गाऐवजी इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकीमार्गे गोरखपूरला पोहोचेल.


गाडी क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस सोमवार, 17 रोजी निर्धारित मार्गाऐवजी बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूरमार्गे वाराणसीला रवाना होईल.
गाडी क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस
सोमवार, 17 व मंगळवार, 18 रोजी आपल्या निर्धारित मार्गाऐवजी बाराबंकी, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसला जाईल.
गाडी क्रमांक 11072 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस 17 व 18 रोजी निर्धारित मार्गाऐवजी जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीनामार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस रवाना होणार आहे.