कन्नट घाटात भरधाव बोलेरो कोसळली : दोघांचा मृत्यू


Speeding Bolero crashes in Kannur Ghat : Two killed चाळीसगाव (17 फेब्रुवारी 2005) : कन्नड घाटात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघत्तंचा मृत्यू झाला. जय मल्हार पॉईंटजवळ शनिवारी हा अपघात घडला. मुकेश राजेंद्र महाजन (36, ओंकार कॉलनी, नाशिक) व जितेंद्र राजेंद्रमहाजन (25, अभिनव शाळेसमोर, चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत.

नियंत्रण सुटल्याने अपघात
बोलेरो कारवरील चालकाचे कन्नड घाटात नियंत्रण सुटताच ती 300 फूट दरीत कोसळली. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मुकेश राजेंद्र महाजन (36, ओंकार कॉलनी, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला तर विजय महाजन, जितेंद्र महाजन (दोन्ही रा.चाळीसगाव) व दीपक बोंडाळे (नाशिक) हे जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना जितेंद्र महाजन (चाळीसगाव) यांचीही प्राणज्योत मालवली.




अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नाशिकस्थित मुकेश महाजन हे चाळीसगाव येथे सासरी आल्यानंतर शालक विजय महाजन व इतरांसह घाटात फिरण्यासाठी आल्यानंतर वाहनाला अपघात घडला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !