चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पासाठी एक हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता


चाळीसगाव (18 फेब्रुवारी 2025) : मंगळवारी राज्याच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या एक हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची बैठक झाली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेतले असून हे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. त्यामध्ये जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी सहा निर्णय घेण्यात आले आहे.


  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
  • म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणार्‍या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1 हजार 594 कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1 लाख 8 हजार 197 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
  • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (-छढऋ) 346 नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता (गृह विभाग)
  • सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता (वित्त विभाग)
  • राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (छकङचङ) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)
  • जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या एक हजार 275 कोटी 78 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता
  • चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8 हजार 290 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा (जलसंपदा विभाग)
  • पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी (महसूल विभाग)

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !