गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत : चांगदेवातील संशयीत वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात
वरणगाव पोलिसांची कामगिरी : दोन जिवंत काडतूस व कट्टा जप्त
वरणगाव (19 फेब्रुवारी 2025) : वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात एक संशयीत गावठी कट्ट्याद्वारे दहशत निर्माण करीत असल्याची माहिती वरणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयीताला ताब्यात घेत अटक केली. संशयीताकडील चार हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस व 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (30, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात संशयीत अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (30, रा.चांगदेव, ता.मुक्ताईनगर) हा गावठी कट्टा बाळगून दशहत निर्माण करीत असल्याचे वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना कळताच त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.








