दाम्पत्यावर पिस्तूल रोखत सराफा दुकानावर दरोडा
नाशिक (19 फेबुवारी 2025) : पिस्तूल रोखत सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या श्री ज्वेलर्स या दुकानात दरोडा टाकण्यात आला. दुकानातील मांडण्यातील सर्व सोन्याचे दागिने गोणीत भरून कॉलनी रस्त्याने दरोडेखोरांनी दुचाकीने पळ काढला.
काय घडले नाशिकमध्ये
सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दराडेखोर दुकानात शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबला.
दुकान मालक दीपक घोडके व त्यांची पत्नी मनीषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील 30 तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केले. यावेळी त्यांनी मराठीतुन आपआपसांत संवाद साधला, असे मनीषा घोडके यांनी सांगितले. हे दोघे परिसरातील सिसिटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.








