भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात मेट्रोपॉलीस हेल्थकेअर सेंटर जळगावतर्फे आरोग्य तपासणी
भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : स्वर्गीय दादासाहेब एन. के. नारखेडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शहरातील के.नारखेडे विद्यालयात शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, निलेश भरत पाटील, रिजनल मॅनेजर मेट्रोपॉलीस हेल्थकेअर सेंटर जळगाव व त्यांचे सहकारी सुनील कोळी, धनंजय कोष्टी, सागर जाधव, काजल बारी, शैलेंद्र महाजन, ज्ञानेश पाटील व ममता महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, पर्यवेक्षक बी.बी.जोगी, एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते.



निलेश पाटील व डॉ.मकरंद नारखेडे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संगणक विभाग संस्थेचे व भगिनी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी आभार मानले.
आरोग्य तपासणीच्या माध्यमातून शिक्षकांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, नियमित तपासणी करून घ्यावी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
