भुसावळातील विवेकानंद विद्यामंदिरात नशामुक्ती जनजागृती कार्यशाळा उत्साहात

पालकांचा उत्स्फूर्त सहभाग ; विद्यार्थ्यांचे प्रभावी पोस्टर प्रेझेंटेशन ठरले विशेष आकर्षण


भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : विवेकानंद बहुद्देशीय संस्था संचलित शहरातील विवेकानंद विद्यामंदिरात विद्यार्थी व पालकांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नशामुक्ती जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पोस्टर प्रेझेंटेशनने कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरवत उपस्थितांची मने जिंकली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा खरे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन एस. राणे होते. संस्थेच्या संचालक मंडळातील प्रा.डॉ.संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रा.डॉ.दयाघन एस.राणे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व, व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर होणार्‍या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन केले. व्यसन ही केवळ व्यक्तीची समस्या नसून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि समाजावर होत असल्याने व्यसनांपासून दूर राहणे, व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करणे आणि समाजात नशामुक्तीची जनजागृती करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यशाळेत अनेक पालकांनी उत्स्फूर्तपणे आणि उत्कृष्ट सहभाग नोंदविला. मुख्याध्यापिका सुनंदा खरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोस्टर प्रेझेंटेशनमधून त्यांच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक जाणीवेला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष जयंतीलाल सुराणा यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !