भुसावळात आर्थिक साक्षरता उद्बोधन वर्गाचे आयोजन


भुसावळ (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : संत गाडगेबाबा महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅलीच्या सहकार्याने कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फायनान्शियल लिटरेसी’ या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांची उपस्थिती होती.

80 विद्यार्थ्यांचा सहभाग
या सेमिनारमध्ये श्री संत गाडगे बाबा हिंदी महाविद्यालय आणि सु. ग. तेमणी हिंदी कन्या विद्यालयातील जवळपास 80 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्य मार्गदर्शक यश श्रीवास होते. रोटरी तापी व्हॅलीचे अध्यक्ष डॉ.विवेक जोशी, सचिव सुधाकर सन्नासे, प्रोजेक्ट चेअरमन कुणाल गालफाडे प्रामुख्याने उपस्थित होते. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य सुधीर शर्मा, अजय मिसर, परेश शाह, राम पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.शिफा खान तर आभार प्रा. अनुपम शर्मा यांनी मानले. सु.ग.तेमणी हिंदी विद्यालयातून प्रा.अर्चना शर्मा, प्रा.काळे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.समता तायडे, ज्योती ओस्तवाल, प्रा.हेमांगी कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !