महादेव तांडा येथे अल्पवयीन तरुणीची आत्महत्या


भुसावळ (19 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा गावातील अल्पवयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोमल संदीप राठोड (15 वर्ष तीन महिने) असे मृताचे नाव आहे.

तरुणीने आत्महत्या का केली ? याचे कारण कळू शकले नाही. कोमल राठोड या तरुणीने 15 रोजी राहत्या घरी कुठल्यातरी कारणावरून विष प्राशन केल्याने तिचे नातेवाईक उमेश पंडित जाधव यांनी तिला जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ती भुसावळ तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक नंदकुमार काळे करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !