यावल तालुक्यात इयत्ता दहावी परीक्षेसाठी तयारी पूर्ण


यावल (19 फेब्रुवारी 2025) : शहर व तालुक्यातील किनगाव येथे इयत्ता दहावीच्या परिक्षेची बैठक व्यवस्था पूर्णत्वास आली आहे. केंद्र क्रमांक 3655 डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल यावल (ब) येथे मराठी माध्यमाचे 309 व उर्दू माध्यमाचे विद्यार्थी 246 असे एकूण 555 विद्यार्थी आहेत. मराठी माध्यमासाठी बैठक क्रमांक डी 198747 ते डी 199307 अशी आहे तर उर्दू माध्यमासाठी डी 199050 ते डी 199308 अशी व्यवस्था आहे.

बोर्ड परीक्षा शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून ते 17 मार्चपर्यंत आहे. केंद्र संचालक म्हणून डॉ.नरेंद्र महाले कामकाज पाहत आहेत. किनगाव येथील केंद्र क्रमांक 3690 नेहरू विद्यालय, किनगावचे केंद्र संचालक अमजद जफर उल्ला खान आहेत. एकूण 434 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. येथे डी 201841 ते डी 202280 दरम्यान बैठक व्यवस्था असेल. नेहरू विद्यालयासह शेजारील माध्यमिक विद्यालय व काही जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्ग खाल्यामध्ये विद्यार्थी पेपर सोडवतील.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !