निलंबित तहसीलदारांविरोधात गुन्हा : काय आहे भानगड
नाशिक (19 फेब्रुवारी 2025) : नाशिक शहरात बांगलादेशींना जन्म दाखल्याद्वारे भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची नियुक्ती झाली असून आतापर्यंत नऊ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आता निलंबित नायब तहसीलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे प्रकरण
नाशिक शहरात बांगलादेशींना जन्म दाखल्याद्वारे भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची नियुक्ती झाली आहे. तहसीलदार विशाल सोनवणे यांनी याबाबतची तक्रार दिली होती. मंगळवारी या प्रकरणात निलंबित तहसीलदार संदीप धारणकर यांचा संशयित आरोपींच्या यादीत समावेश करण्यात आला.

पोलिसांच्या अहवालात नायब तहसीलदार धारणकर यांना पसार दाखविण्यात आल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात राज्य शासनाने तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार धारणकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. संशयितांच्या यादीतही नायब तहसीलदारांचा समावेश झाल्याने अधिकारीवर्गाचे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, डिफेन्स कमिटीचे आसीफ शेख व मुस्तकीन डिग्निटी यांनी एसआयटी पथक तपासात भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. जबाबदार अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.
