पोलिसांच्या वाहनांवर जमावाकडून दगडफेक


भिवंडी (19 फेबुवारी 2025) : आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर भिवंडी भागात स्थानिकांनी पोलिसांवरच हल्ला केला. या घटनेत पोलीस जखमी झाला असून पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे.

काय घडले नेमके ?
भिवंडी शहरातील वर्‍हाळ देवी नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजार्‍यांमधील मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयावरून भांडण झाले होते. यात अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडिलांना देखील मारहाण करण्यात आली. घाबरलेल्या मुलीने फियाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पालकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना मिळताच पोलीस आयजीएम रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी अल्पवयीन मुलीचा जबाब घेतला.




आरोपी हे वर्‍हाळ देवी नगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार आणि सुनील शिंदे, तडवी हे पथक स जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले. या वेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलिस पथकासोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा आणि आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 30 ते 40 जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलीस वाहनावर दगडफेक करत हल्ला चढवला.

या हल्ल्यात पोलिस शिपाई तडवी यांना दगड लागला आणि त्यात ते जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या जीपवर देखील दगडफेक करत गाडीचे मोठे नुकसान केले. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या आईकडून मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली असून यात जवळपास 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !