भुसावळ पालिकेत सफाई कामगारांची संख्या वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार : राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान


भुसावळ (बुधवार, 16 सप्टेंबर 2026) : भुसावळ पालिकेतील कर्मचारी संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टीने शासनाकडे अहवाल सादर करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांनी येथे दिली. याप्रसंगी त्यांच्याहस्ते तीन कर्मचार्‍यांना वारसा हक्काने नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी सारवान यांनी पालिका प्रशासनाशी चर्चा करीत सफाई कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्नांचा आणि कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

सफाई आयोगाकडून पालिकेचे कौतुक
सफाई कर्मचार्‍यांचा विकास, त्यांचे हक्क आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी सारवान यांनी बुधवारी पालिकेला भेट देत आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार ऋषी घोडेस्वार, राधाबाई नरवाडे आणि शिवकुमार कालोचे यांना नगरपालिकेत शासकीय सेवेत नियुक्त्या देण्यात आल्या. या सर्व नियुक्त्या नियमानुसार व लाड पागे समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करून देण्यात आल्याबद्दल राज्य सफाई कर्मचारी आयोगाने समाधान व्यक्त केले. श्रमसाफल्य योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असेही सारवान यांनी स्पष्ट केले.




यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, पालिका उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, नगरसेविका मेघा वाणी, सोनी बारसे, दीपक अहिरे, मनोज मोरे, वैभव पवार, जाधव आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !