जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : अट्टल चोरटे दोन दुचाकींसह जाळ्यात
जळगाव (20 फेब्रुवारी 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकत दोन गुन्हे उघडकीस आणले. आकाश सुरेश शिंदे (19, रा. साईनगर, कुसूंबा, ता.जळगाव) व सुरज मुनेंद्र द्विवेदी (22, रा. सेक्टर डी, साईमत ऑफिसजवळ, जळगाव) अशी अटकेतील आरोपींचीं नावे आहेत.
दोन गुन्ह्यांची उकल
सिद्धार्थ दीपक शर्मा (23, रा.बालाजी मंदिर जवळ, जळगाव) यांची 25 हजार रुपये किंमतीची पल्सर 29 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री 12.30 वाजता चोरी झाली होती. पोलिसांनी सापळा रचत 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 1 वाजता आकाश सुरेश शिंदे (19, रा. साईनगर, कुसूंबा, जळगाव) याला चोरीच्या दुचाकीसह पकडले.



दुसर्या कारवाईत सायरस महेश बोंडे (28, रा.किसनराव नगर, गिरणा पंपिंग रोड, रामानंद नगर, जळगाव) यांची 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान शिरसोली रोडवरील रॉयल टर्फ परिसरातून 35 हजार रुपये किंमतीची होंडा ड्रीम युगा मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी 19 रोजी सुरज मुनेंद्र द्विवेदी (22, रा. सेक्टर डी, साईमत ऑफिस जवळ, जळगाव) याला चोरीच्या दुचाकीसह अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत झनके, दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, प्रदीप चौधरी, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे, रतन गीत, छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे, विशाल कोळी यांच्या पथकाने केली.





