बोदर्डेतील दुचाकीस्वार भरधाव पिकअपच्या धडकेने जागीच ठार
पारोळा (21 फेब्रुवारी 2025) : मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिल्याने 43 वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात गुरुवार, 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता पारोळा तालुक्यातील जलसा हॉटेलजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला. राजेंद्र भिका पाटील (43, रा.बोदर्डे, ता.पारोळा) असे मृताचे नाव आहे.
काय घडले नेमके ?
राजेंद्र पाटील हे दुचाकीने (एम.एच.19 बी.आर.0163) पारोळ्याकडून धुळ्याकडे जात असताना समोरून येणार्या पिकअप व्हॅनने (एम.एच.15 जे.डब्ल्यू.2695) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप व्हॅन चालक वाहन घेऊन पसार झाला.








