भुसावळ शहरात उद्या भव्य रोजगार मेळावा


भुसावळ (21 फेब्रुवारी 2025) : शहरातील प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता सभागृहात समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान व भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार, 22 रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या मेळाव्यात सहाशेहून कुशल व अकुशल स्थानिक बेरोजगारांना जागेवरच नोकरी दिली जाणार आहे.

या मेळाव्याला जळगावच्या श्री केशव स्मृती प्रतिष्ठान, भुसावळातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवमुद्रा प्रतिष्ठान, कवयित्री बहिणाबाई चोधरी विद्यापीठ, जळगाव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जळगावातील श्री जी.एम.फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे.


या कंपनीत नोकरीची संधी
जळगाव जिल्ह्यातील जैन फॉर्म फ्रेश जळगाव, युवा शक्ती नाशिक, हिताची स्टीमो ब्रेक. प्रा.लि.जळगाव, किरण मशीन टुल्स जळगाव, फ्युचर टेक्स जळगाव,टी.डब्लयु.जे, जळगाव, जैन इंरिकेशन प्रा.लि, मानराज मोटर्सजळगाव,गोविंदा एच.आर.नाशिक अशा आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे. याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 09.45 ते संध्या.06.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0257 – 2959790 वर संपर्क साधावा असे आवाहन जळगाव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त, संदीप ज्ञा.गायकवाड यांनी केले आहे.

हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगाराची संधी
भुसावळ शहरात होणार्या रोजगार मेळाव्याला हजारो बेरोजगार कुशल-अशकुल कर्मचार्यांच्या हातांना जागीच काम मिळणार आहे. मेळाव्यासाठी क्यूआर कोडवर नोंदणी आवश्यक असून आतापर्यंत अनेक कंपन्यांनी नोंदणी केली आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील बेरोजगार कुशल-अकुशल तरुणांनी मेळाव्याचा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे व आयोजकांनी केले आहे.

यांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती
मंत्री संजय सावकारे, जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू व्हि.एल.माहेश्वरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित कुमार, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आदींची उपस्थिती राहणार आहे.

 

 

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !