दहिगावात लग्नाला आलेल्या महिलेच्या बॅगमधून सोन्याचे दागिने लांबवले


यावल (21 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव गावात लग्न समारंभात आलेल्या 26 वर्षीय विवाहितेच्या बॅगमधून चार लाख 82 हजार 387 रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने लांबवले. ही घटना 16 फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी महिलेने कल्याण रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर तो तपासार्थ यावल पोलिसात वर्ग करण्यात आला.

काय घडले नेमके ?
दहिगाव गावात जयश्री गणेश पाटील या महिला राहतात. त्यांच्याकडे एका विवाह समारंभात उपस्थिती देण्यासाठी उन्नती प्रकाश सूर्यवंशी (26, सरस्वती अनंतराज सोसायटी, बागशाला मैदान जवळ, डोंबिवली पश्चिम, जि.ठाणे) या आल्या होत्या. 16 फेब्रुवारी रोजी रात्री त्या जयश्री गणेश पाटील यांच्या घरी यांच्या बेडरूममध्ये झोपल्यानंतर त्यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने सोन्याचा नेकलेस, राणीहार, सोन्याची पट्टी पोत असा एकूण चार लाख 82 हजार 387 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर महिलेने कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला व हा गुन्हा आता तपासासाठी गुरुवारी यावल पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !