खून प्रकरणातील संशयीत जामिनावर येताच जळगावात तरुणावर प्राणघातक हल्ला


A young man was fatally attacked in Jalgaon as soon as the suspect in the murder case was released on bail. जळगाव (21 फेब्रुवारी 2025) : जळगावात 2020 मध्ये झालेल्या खून प्रकरणात अटकेतील संशयीत जामीनावर बाहेर येताच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शाहू नगराजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रतीक हरिदास निंबाळकर (29, जुना कानळदा रोड, सिटी कॉलनी, जळगाव) असे जखमीचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
2020 मध्ये झालेल्या खून प्रकरणात प्रतीक निंबाळकर संशयीत असून ते गेल्या काळापासून कारागृहात होता व शुक्रवारी त्याची सुटका झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रतीक निंबाळकर हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकरसोबत दुचाकीने घरी जाण्यासाठी जात असताना शाहूनगर येथील धरम हॉटेलजवळ घात लावून बसलेल्या तिघाा हल्लेखोरांनी प्रतीकवर वार करीत डोक्यावर गंभीर दुखापत केली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !