भुसावळात कायद्याच्या परीक्षेत सर्वच अंमलदार अव्वल

हवालदार संजय तायडे प्रथम तर कॉन्स्टेबल लीना तायडे द्वितीयस्थानी


भुसावळ (22 फेब्रुवारी 2025) : पोलीस अंमलदारांना नवीन कायद्यांमधील तरतूदी कळाव्यात, न्यायालयीन न्यायनिवाड्यांची माहिती मिळावी व पोलिसांचे कायदेविषयक ज्ञान वृध्दींगत व्हावे या उद्देशाने भुसावळ उपविभागातील 63 अंमलदारांची कायदेविषयक परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत 18 अंमलदारांनी 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले तर भुसावळ तालुक्याचे हवालदार संजय आत्माराम तायडे (89 गुण) प्रथम तर कॉन्स्टेबल लीना मधुकर लोखंडे (83) यांनी द्वितीय व हवालदार कैलास अशोक बाविस्कर यांनी 77 गुण तृतीय क्रमांक पटकावला.

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते होणार सन्मान
शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलातील कर्मचार्‍यांना प्रचलित व नवीन कायद्यांचे असलेले ज्ञान जाणून घेण्यासाठी भुसावळ शहरातील शासकीय आयटीआयमध्ये नुकतीच भुसावळ विभागातील 63 अंमलदारांची कायदेविषयक शंभर गुणांची परीक्षा घेण्यात आली. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, किरकोळ कायदे, महाराष्ट्र पोलीस नियमावली 1959 या विषयांवर आधारीत शंभर गुणांच्या परीक्षेत भुसावळ तालुक्याचे 36, शहर वाहतूकचे 14, उपअधीक्षक कार्यालयातील आठ व भुसावळ शहरचे पाच मिळून 63 अंमलदार परीक्षेत सहभागी झाले. या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या कर्मचार्‍यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याहस्ते बक्षिसाने गौरव करण्यात येणार आहे.


कायद्याचे ज्ञान होणार अद्यावत
ज्या पोलिसांनी कायद्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला आहे त्यांचा जळगाव पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत बक्षीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे शिवाय पोलिसांचे कायदेविषयक ज्ञान वृध्दींगत व्हावे या उद्देशाने परीक्षा घेण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या कायदेविषयक ज्ञानामुळे त्यांना आता अधिक दर्जेदार पद्धत्तीने तपास करण्यासाठी मदत होणार असल्याचे भुसावळातील उपक्रमशील पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !