भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन


भुसावळ (28 फेब्रुवारी 2025) : श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिवस आणि कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर प्रमुख अतिथी होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.शरद अग्रवाल होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या समूहगीताने झाली. मराठी विभागाचे विभाग प्रमुख विनोद भालेराव यांनी प्रास्ताविकात मराठी विभागातर्फे वर्षभरात घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धांची माहिती दिली. डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विद्यार्थिनींनी मराठीत संवाद साधून संवाद कौशल्य विकसीत करावे तसेच कॉलेज कट्ट्याच्या उपक्रमातून कवितांचे वाचन, कथाकथन एखाद्या पुस्तकाचे परीक्षण करून ग्रुपने चर्चा करावी व त्यातूनच आपले व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा, असे आवाहन केले.

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांचे स्वागत डॉ.जान्हवी तळेगावकर यांनी केले. उपस्थित विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे टाळ्यांच्या गडगडात या स्वगताचे स्वागत केले. धनश्री भोईने आपली स्वरचित ‘महाराष्ट्र देशा’ ही कविता सादर केली. ज्योती सावकारेने ‘माझी मराठी’ ही कविता सादर केली. दीक्षा गजरे, दीपाली कोळी, ज्योती सावकारे, अर्पिता तायडे, धनश्री भालेराव, प्रतीक्षा जवरे या विद्यार्थिनींनी ‘तू चाल पुढ रे गड्या भीती कुणाची‘ या कवितेचे समूह गायन केले. सूत्रसंचालन धनश्री कोळी तर आभार प्रदर्शन प्रा.भावना संकोपाळ यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.दीपाली पाटील, भूगोल विभागाचे प्रा.गिरीश सरोदे, प्रा.निलेश गुरचल, डॉ.गिरीश कोळी, प्रा.जाकीर शेख, प्रा.शामकांत बाविस्कर, प्रा.सना खान, प्रा.हेमांगी कोळी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !