एरंडोलला रिल स्टार तरुणाची हत्या : मृताच्या काका, चुलत भावासह जेसीबी चालकाला अटक
Reel star youth murdered in Erando l; JCB driver arrested along with deceased’s uncle, cousin एरंडोल (28 फेब्रुवारी 2025) रील स्टार असलेल्या मुलाकडून वडिलांना होणार्या मारहाणीमुळे भाऊबंदकीनेच एकत्र येत तरुणाचा खून केल्याची घटना एरंडोल शहरात गुरुवारी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर विचलीत झालेल्या सैन्य दलातील माजी सैनिक असलेल्या पित्याने मुलाच्या खुनानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली. दरम्यान, एरंडोल पोलिसांच्या तपासात या गुन्ह्यात अन्य तीन आरोपींचाही सहभाग आढळल्याने त्यांना रात्री उशिरा गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आली.
मुलाच्या मारहाणीला कंटाळून मुलालाच नातेवाईकांनी संपवले
रील स्टार असलेल्या विकी उर्फ हितेश हा माजी सैनिक असलेल्या वडील विठ्ठल पाटील यांच्यापासून विभक्त राहत असतानाही माजी सैनिक असलेल्या वडिलांचा छळ करून मारहाण करीत होता. या प्रकाराला कंटाळून मंगळवार, 25 रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विठ्ठल पाटील (वृंदावन नगर, एरंडोल) यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. त्यात मुलगा हितेश हा दारू पिवून सातत्याने मारहाण करीत होता व त्यास कंटाळून आपण त्याचा भोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ खून करीत मृतदेह पुरल्याचा उल्लेख होता. कुठवर अन्याय सहन करायचा म्हणत त्यांनी खुनाची घटना का घडली ? याचा उल्लेखही चिठ्ठीत केल्यानंतर खुनाची घटना समोर आली. बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलखडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा दिली व गुरुवारी मयत तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले.



पोलिसांच्या तपासात अन्य आरोपी निष्पन्न
मयत विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या खुनाची कबुली देत आत्महत्या केली असलीतरी केवळ एकट्याकडून खून करून मृतदेह पुरण्याची बाब अशक्य असल्याने एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी तपासाला गती दिली व या खुनात मयत तरुणाचा काका, चुलत भाऊ व जेसीबी चालकही सहभागी असल्याची बाब निष्पन्न होताच त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्यानंतर खुनाचा नेमका प्रकार समोर आला.
चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
मयत रील स्टार हितेशची पत्नी शीतल हितेश पाटील (20) हिने एरंडोल पोलिसात पतीच्या खून प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मयत विठ्ठल पाटील, मयत पतीचा काका नामदेव सखाराम पाटील (55, भंवरखेडा, ता.धरणगाव) काकांचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील (28, रा.भवरखेडा) व जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील (24, भवरखेडा) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व सहकारी करीत आहेत.