दीपनगर वसाहतीत चोरट्यांचा धुडगूस : चार घरे फोडली


Thieves raid Deepnagar colony: Four houses broken into भुसावळ (28 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कामगार वसाहतीत एकाच रात्री चोरट्यांनी चार घरांना टार्गेट करीत मुद्देमाल लांबवला. घरफोडीचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

रहिवासी गावाला : चोरटे दाराला
दीपनगर येथील कामगार वसाहतीतीील थ्री टाईप इमारतीत चार बंद घरांना टार्गेट केले. रोकडे, बदे, खैर, भारंबे या रहिवाशांच्या घरांना कुलूप असल्याने मध्यराी चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. गुरुवारी रहिवाशांना घरे उघडी दिसल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला. रहिवासी बाहेरगावी गेल्यानंतर नेमका काय ऐवज चोरीला गेला ? हे रहिवासी आल्यानंतरच कळणार आहे. घरफोड्यांमुळे रहिवासी मात्र धास्तावले आहेत. दीपनगरचे सुरक्षा अधिकारी कृणाल वाघोदे यांनी भेट देऊन चौकशी केली. दरम्यान, घरफोडीचा प्रयत्न झाला मात्र कुठलाही मुद्देमाल चोरीला गेला नसल्याचे भुसावळ तालुका निरीक्षक महेश गायकवाड म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !