मुक्ताईनगरात धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी शेतकर्याचे एक लाख 65 हजार लांबवले
Thieves who came in style in Muktainagar robbed a farmer of Rs 1 lakh 65 thousand मुक्ताईनगर (28 फेब्रुवारी 2025) : शहरातील भुसावळ रोडलगत असलेल्या चैतन्य मल्टिसर्व्हिसेस ग्राहक सुविधा केंद्रात पैसे भरण्यासाठी आलेल्या शेतकर्याचे लक्ष विचलीत होताच भामट्यांनी दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली बॅग लांबवली. या बॅगेत तब्बल एक लाख 65 हजारांची रोकड होती. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरातील व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.
वॉच ठेवून आरोपींनी केली चोरी
वासुदेव सुपडू पाटील (56, बोहर्डी, ता.मुक्ताईनगर) या शेतकर्याने एका बँकेतून कामासाठी रक्कम काढली व एकाला रक्कम पाठवण्यासाठी ते ग्राहक केंद्रात आले. गुरुवारी 27 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ते काम आटोपून दुचाकीजवळ गेले व दुचाकी सुरू करताना ती सुरू होत नसल्याने त्यांनी खाली वाकून पाहताच दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली रक्कम असलेली पिशवी घेवून भामटे पसार झाले. हा प्रकार पोलिसांना कळवताच त्यांनी धाव घेतली. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजकुमार चव्हाण करीत आहेत.


