भंगाळे गोल्डतर्फे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट
जळगाव (28 फेब्रुवारी 2025) : व्यवसायासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी पेढी मे. भंगाळे गोल्ड यांचेतर्फे आज फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टला इलेक्ट्रिक गोल्फ कार भेट म्हणून दिली गेली.
ट्रस्टच्या वतीने महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी भंगाळे गोल्डचे संचालक सागर भंगाळे यांचेकडून कारची किल्ली स्विकारली. यावेळी सुरेखा भागवत भंगाळे, श्लोक भंगाळे, स्वप्निल महाजन, शीतल महाजन आदी उपस्थित होत्या.

