छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सवात ‘डीजे बंदी’


छत्रपती संभाजीनगर (सोमवार, 7 सप्टेंबर 2026) : डीजेच्या दणदणाटामुळे होणारे दुष्पपरिणाम पाहता यंदा छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सव डीजे मुक्त होणार आहे. गणेशोत्सव गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डीजेमुक्त करा व गणेश मंडळे आणि नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी शेवटचे पाच दिवस देखावे मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन हॉलमध्ये आयोजित शांतता समिती बैठकीत दिले.

काय म्हणाले पालकमंत्री !
डीजेला बंदी केल्याने काही जणांची नाराजी झाली पण डीजे बंदीमुळे झांज पथक, आकर्षक मानवी देखाव्यांचा सहभाग वाढत आहे. ही बाब कुठल्याही उत्सवासाठी महत्त्वाची बाब आहे, असे शिरसाट म्हणाले. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी परजिल्ह्यातून येणार्‍या डीजेसाठी नाकेबंदी केली जाईल. काही लोकांनी शहरातही डीजेच्या गाड्या बनवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करू. शहराने हेल्मेटची स्वीकृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुठलीही अडचण सोडवण्यासाठी तत्पर आहेत तर त्याही पुढे थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डीजे बंदीची घोषणा होताच दरवाजे ठोकले
डीजे बंदीचे फर्मान सोडताच कार्यकर्त्यांचा संयम सुटला. आपले प्रश्न न ऐकता अटी लादल्या जाताहेत, असे म्हणत कार्यकर्ते सभागृहाबाहेर पडले. बैठकीनंतर बाहेर पडलेल्या पोलीस आयुक्तांना त्यांनी घेराव घातला. यंदा 2 बेस, 2 टॉपची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !