गोवंशाची निर्दयतेने वाहतूक : रावेरात चार गुरांची सुटका


रावेर (1 मार्च 2025) : गोवंशाची निर्दयतेने वाहतूक करणारी महेंद्रा पिकअप वाहन रसलपूरनजीक ताब्यात घेत पोलिसांनी चार गुरांची सुटका केली. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले. महेंद्रा पिकअप गाडीसह पोलिसांनी चार लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पालच्या वाहन चालकाविरोधात गुन्हा
गुरुवार, 27 रोजी रात्री रसलपूर-आभोडा रस्त्यावर पिकअप वाहन (एम.एच.28 एच. 8989) आढळल्यानंतर वाहनात चार गुरे कोंबून त्यांची निर्दयीपणे वाहतूक होत असताना चालक आरीफ शेख फरीद (रा.पाल) आढळला व त्याच्याकडे गुरे वाहतुकीचा परवाना आढळला नाही. रावेर पोलिसांनी गुरांची रावेर येथील श्रीकृष्ण गोशाळेत रवानगी केली. चार लाखांची गाडी व 54 हजार रुपये किंमतीची गुरे मिळून एकूण चार लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक आरीफ शेखविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.




यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सतीश सानप, सचिन घुगे, प्रमोद पाटील,सुकेश तडवी, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !